Pawan Singh Monalisa song Jag Hai Pa Jata mppg 94 | तुफान व्हायरल होणारं ‘हे’ भोजपुरी गाणं तुम्ही पाहिलंय का?

0
26
Spread the love

अभिनेता पवन सिंह भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. दमदार अभिनयासोबतच पवन आपल्या अनोख्या डान्स शैलीसाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा व्हिडीओ युट्यूबवर चार कोटीपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

अवश्य पाहाच – WWE हा खेळ पैशांचा… खेळाडूंची संपत्ती पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

अवश्य पाहा – “करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

‘जग है पा जाता’ असं या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात पवन सिंहसोबत अभिनेत्री मोनालिसा रोमान्स करताना दिसत आहे. मोनालिसा देखील आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. मोनालिसा आणि पवन सिंह ही भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी आहे. ‘जग है पा जाता’ हे गाणं ‘जिद्दी आशिक’ या चित्रपटातील आहे. हे गाणं स्वत: पवन सिंहने गायलं आहे. रमाकांत प्रसाद यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 8:17 pm

Web Title: pawan singh monalisa song jag hai pa jata mppg 94Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)