petrol price unchanged: मागणी वाढली; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचा दर – petrol and diesel price today unchanged

0
70
Spread the love

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. याआधी मंगळवारी कंपन्यांनी डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ केली होती. तर सलग १२ दिवस पेट्रोल दर ‘जैसे थे’ आहेत.

मुंबईत शनिवारी पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ रुपयांवर कायम आहे. तर डिझेलचा प्रती लीटर भाव ७९.०५ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपये प्रती लीटर तर डिझेलचा भाव ८०.७८ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये आहे. चेन्नईत डिझेल ७७.९१ रुपये आणि कोलकात्यात ७५.८९ रुपयांपर्यंत स्थिर आहे.

जागतिक बाजारात क्रूड २ टक्के वाढून ४०.५५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमतींना बळ मिळाले आहे. मागील काही दिवस तेलाच्या किंमतींमध्ये चढ उतार दिसून आले आहेत. त्याशिवाय तेलाच्या किंमती वाढवण्यासाठी अमेरिकेतील तेल उत्पादकांनी उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे शुक्रवारी तेलाचे भाव सरासरी २ टक्क्यांनी वाढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

डिजिटल व्यवहार सुस्साट; डोळे दिपवणारी झाली वाढ!
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. गेल्या महिन्याभरात २१ वेळा पेट्रोल आणि २३ वेळा डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

करोनाचा शॉक; २०० वर्षांची परंपरा असलेली कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर!
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार जूनमध्ये इंधनाची मागणी वाढली आहे. सध्या देशात टप्प्याटप्याने अनलॉक-१ची प्रक्रिया सुरु आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील , आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. जूनमध्ये पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूचा १६.२९ दशलक्ष टन खप झाला. मे महिन्याच्या तुलनेत त्यात ११ टक्के वाढ झाली. मात्र गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत अजूनही इंधन विक्री ७.९ टक्के कमीच आहे. पण इंधन विक्री आता हळूहळू लॉकडाउनपूर्व पदावर येत असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)