Philippines warns China of severest response over drills xi jinping | युद्धसराव थांबवा, अन्यथा…; फिलिपिन्सचा चीनला इशारा

0
23
Spread the love

गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या जवानांच्या चकमकीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातारवण निर्माण झालं आहे. त्यानंतर आता फिलिपिन्सनेदेखील चीनला इशारा देत दक्षिण चीन महासागरातील युद्धसराव थांबवण्यास सांगितलं आहे. चीननं युद्धसराव न थांबल्यास त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतील, असा इशारा फिलिपिन्सनं दिला आहे.

“दक्षिण चीन महासागरात चीननं युद्धसराव न थांबवल्या त्यांना गंभीर परिणांमांना सामोरं जावं लागेल,” अशी प्रतिक्रिया फिलिपिन्सचे परराष्ट्र सचिव तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी दिली. “चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) १ जुलैपासून पेरासेल बेटांनजीक युद्धसराव करत आहे. तसंच युद्धसरावामुळे सर्व जहाजांना या क्षेत्रात नेव्हिगेट करण्यापासून रोखण्यात येत आहे,” असा आरोपही त्यांनी केला. असोसिएटेड प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पीएलए ज्या ठिकाणी युद्धसराव करत आहे त्या ठिकाणी पेरासेलवरून जाणारं पाणीही बंद करण्यात आलं आहे. हे पाणी व्हिएतनाममधील औषध कंपन्यांसाठी देण्यात येतं. चीननं आता फिलिपिन्सच्या क्षेत्रावर कब्जा करू नये असं म्हणत तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी चिंताही व्यक्त केली. “जर चीननं हा युद्धसराव सुरू ठेवला तर त्यांना याचा गंभीर परिणाम मग तो कोणत्याही स्तरावरील असो तो भोगावा लागेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी चिनी तटरक्षक जहाजामुळे व्हिएतनामच्या मच्छीमारांची एक बोट बुडाली होती. त्यामध्ये आठ मच्छीमारांचा समावेश होता. त्यानंतर व्हिएतनामनं चीनचा निषेध केला होता. त्यावेळीदेखील फिलिपिन्सनं व्हिएतनामची बाजू घेतली होती. तसंच समुद्रातील मोठ्या भागात नव्या प्रदेशांतच्या केलेल्या घोषणेचाही विरोध केला होता. एकीकडे करोना व्हायरसचं संकट असताना चीनकडून अशा कृती केल्या जात असल्यानंही त्यांना विरोध करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 9:27 am

Web Title: philippines warns china of severest response over drills xi jinping jud 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)