PoK DGPR website hacked: पाकिस्तानची POKमधील वेबसाइट हॅक; ‘हे’ सत्य उघड करण्याचा हॅकरचा इशारा – pok dgpr website was hacked

0
23
Spread the love

नवी दिल्लीः पाकव्याप्त काश्मीरच्या माहिती जनसंपर्क ( PoK DGPR website) संचालनालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. ही वेबसाइट हॅक करून त्यावर पाकिस्तानला दणका देणारा मेसेज लिहिण्यात आला आहे. पाकिस्तानपासून आम्हाला मुक्ती हवी आहे ( we want freedom from Pakistan ) असं या मेसेजमध्ये म्हटलंय. पाकिस्तानमधील पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप मेसेजमधून करण्यात आला आहे.

आझाद जम्मू-काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानच्या कारवायांपासून मुक्ती आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांकडून मानवाधिकार पायदळी तुडवण्यात येत आहेत. निष्पाप नागरिकांचे हाल केले जात असून दहशतवाद पसरवला जात आहे. गेल्या ७० वर्षापासून आझाद जम्मू-काश्मीवर पाकिस्तानी शासकांकडून अनन्वीत अत्याचार केले जात आहेत. पाकच्या या भेदभाव करणाऱ्या धोरणाचा आम्ही निषेध करतो, असा मेसेज हॅकरने लिहिला आहे.

भारतीय हवाई दलाच्या कारवाईत पाकिस्तानचे F-16 हे विमान पाडण्यात आले होते. याचाही उल्लेख हॅकरने मेसेजमध्ये केला आहे. पाकिस्तान हवाई दलाचे F-16 हे विमान गेल्या वर्षी भारतीय हवाई दलाने पाडले होते. मात्र हे गुपित पाकिस्तान जनतेपासून लपवत आहे. यात ठार झालेला पायलट आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल आम्हाला आदर आहे. लवकरच याचं सत्य बाहेर येईल, असा इशाराही हॅकरने पाकिस्तान सरकारला दिला आहे.

‘We want Azaadi’ आम्हाला आझादी हवीय…

पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या मूलभूत अधिकारांवर पाकिस्तानकडून गदा आणली जात आहे. पाकिस्तान त्यांचा आदर करत नाहीए, असा आरोप पाकव्याप्त काश्मीरमधून हद्दपार केलेले सरदार शौकत अली काश्मिरी यांनी अलिकडेच केला आहे. १९४७ मध्ये जम्मू-काश्मीरच्या शासकांना स्वातंत्र्य हवं होतं. पण पाकने ते मिळू दिलं नाही. यानंतर २२ ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकने घुसखोरीकरून जम्मू-काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पाकला यश न आल्याने अजूनही भारताशी छुपी लढाई सुरू आहे, असा आरोप काश्मीर यांनी केला होता.

काश्मीर: कुलगाम येथे चकमक; १ दहशतवादी ठार, १ जवान जखमी

चीनला लावला करकचून ब्रेक, हिरो सायकलने रद्द केली ९०० कोटींची डिल

‘गो नाझी गो बॅक; काश्मीर बनेगा हिंदुस्थान’

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमधील नागरिकांनी जोरदार घोषणा दिल्या होत्या. गो नाझी गो बॅक आणि काश्मीर बनेगा हिंदुस्थान या घोषणा देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी इम्रान खानहे मुझफ्फराबादच्या दौऱ्यावर आले होते. इम्रान खान यांच्या या भेटीपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली होती. पाककडून होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यात आला होता.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)