Police shot a mentally ill man who was dancing with a pistol after firing and arrest him aau 85 |गोळीबार करुन पिस्तुलांसह नाचणाऱ्या मनोरुग्णावर पोलिसांनी झाडली गोळी आणि…

0
70
Spread the love

बँकेच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार करीत इमारतीच्या छतावर जाऊन दोन तास पिस्तुल हातात घेऊन नाचणाऱ्या एका मनोरुग्ण व्यक्तीवर पोलिसांनी गोळी झाडली. यामध्ये जखमी झालेल्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये दिवसाढवळ्या ही थरारक घटना घडली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एक व्यक्ती हातात पिस्तूल घेऊन धुमाकूळ घालत असल्याची बातमी मेरठ शहरात वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा काही स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दिसताच त्या व्यक्तीने पोलिसांवरही गोळीबार करायला सुरुवात केली. त्याच्या दोन्ही हातात दोन गावठी कट्टे होते. त्यानंतर बँकेच्या छतावरुन खाली उतरवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये गोळी त्याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्याला ताब्यात घेतले. तत्पूर्वी, त्याने बँकेच्या सुरक्षा रक्षकावरही गोळीबार केला होता. त्यामुळे बँकेसह परिसरात भीती पसरली होती.

पायाला गोळी लागल्याने तो मनोरुग्ण व्यक्ती जखमी झाला असला तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. अशा प्रकारे मनोरुग्णाच्या हातात पिस्तूल आणि त्याच्याकडून होत असलेला गोळीबार यामुळे स्थानिक लोक घाबरुन गेले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि याची माहिती दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी मेरठचे एसएसपी अजय सिन्हा म्हणाले, “मेरठमधील सरदाना भागात बुधवारी एका माणसाने सिंडिकेट बँकेच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला. त्यानंतर जेव्हा पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा तो जवळच असलेल्या जिन्यावरुन बँकेच्या छतावर जाऊन पोहोचला आणि आपल्या हातातील दोन पिस्तुलांमधून त्याने गोळीबार सुरु केला. त्याच्या एका पायाला गोळी लागल्याने जखम झाली आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 9:50 am

Web Title: police shot a mentally ill man who was dancing with a pistol after firing and arrest him aau 85Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)