Policy changes due to pressure from MLAs Unconditional debt abn 97 | आमदारांच्या दबावामुळे धोरण बदल

0
67
Spread the love

‘विनाअट कर्जहमी’; सत्ताधाऱ्यांशी संबंधित ५० साखर कारखान्यांचा लाभ

संजय बापट

साखर कारखान्यांकडून कर्जाची रक्कम थकविण्यात येत असल्याने साखर कारखाने वा सूतगिरण्यांच्या कर्जाला विनाअट शासन हमी द्यायची नाही, हा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे तीन महिन्यांत बदलण्याची वेळ आली. दोन आमदारांच्या साखर कारखान्यांच्या कर्जाला कोणत्याही अटीविना हमी देण्याच्या निर्णयाचा फायदा सत्ताधाऱ्यांशी संबंधित ५० साखर कारखान्यांना होणार आहे.

राज्यातील सहकारावर हुकमत ठेवण्यासाठी पूर्वी शासन हमीवर कर्ज उभारण्याची मुभा सरकारने कारखान्यांना दिली होती. मात्र याचा गैरफायदा घेत अनेक कारखान्यांनी सरकारच्या हमीवर घेतलेल्या कर्जाची परतफे डच के ली नाही. त्यामुळे राज्य सहकारी बँके ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ६३ साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जहमीपोटी राज्य बँकेला ६९७ कोटी रुपये सरकारला द्यावे लागले. राज्य

बँके प्रमाणेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती या बँकांनी शासन हमीवर कारखान्यांना दिलेल्या ३४६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी  उच्च न्यायालयात धाव घेतली असून हा भरुदडही सरकारच्या माथी पडण्याची शक्यता आहे. काही सूतगिरण्यांनीही सरकारची अशीच फसवणूक केल्यानंतर कोणत्याही सहकारी संस्थेस कर्जासाठी शासन हमी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र स्वपक्षीय विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांच्या आग्रहानंतर महाविकास आघाडी सरकारने या धोरणात बदल करीत राष्ट्रवादीचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ६० कोटी, तर काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्यासाठी १२ कोटी रुपयांच्या कर्जाला विविध अटी-शर्तीच्या आधारे शासन हमी देण्याचा निर्णय डिसेंबरमध्ये घेतला. एवढेच नव्हे तर शासकीय थकबाकी आणि संचित तोटा नसणाऱ्या कारखान्यांनाच थकहमी दिली जाईल. विनाअट कोणालाही थकहमी दिली जाणार नाही असे धोरणही मार्च महिन्यात सरकारने जाहीर के ले. मात्र हे दोन्ही कारखाने या अटींची पूर्तता करू शकत नाहीत असे समोर आल्यावर पुन्हा एकदा या निर्णयात बदल करीत त्यांना के वळ संचालक मंडळाच्या सामूहिक हमी ठरावाच्या आधारे कर्ज देण्यास आणि कर्जाची उचल करण्यास डिसेंबपर्यंत म्हणजेच सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही सरकारला घ्यावा लागला आहे.

तीन महिन्यांत निर्णय बदलला

विनाअट कोणत्याही कारखान्यास थकहमी न देण्याची भूमिका राजकीय अपरिहार्यतेमुळे  तीन महिन्यांतच सरकारला बदलावी लागली. त्यानंतर सुमारे ५० हून अधिक कारखान्यांनीही विनाअट कर्जहमीसाठी सरकारला साकडे घातले आहे.

टाळेबंदीची  परिस्थिती विचारात घेऊन विशेष बाब म्हणून या कारखान्यांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यानुसार या कारखान्यांच्या प्रस्तावांची छाननी करून ते मंत्रिमंडळ उपसमितीसमोर पाठविण्यास साखर आयुक्तांना सांगण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थांनी दिली. मार्च महिन्यातील धोरणानुसार शासकीय थकहमी आणि संचित तोटा नाही या निकषात एक-दोन कारखानेच बसतात.  हे कारखाने सुरू झाले नाहीत तर मोठय़ा प्रमाणात ऊस गाळप शिल्लक राहणार असल्याने विशेष बाब म्हणून या वेळी शासन हमी देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:51 am

Web Title: policy changes due to pressure from mlas unconditional debt abn 97Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)