Pratapgad fort: प्रतापगडाच्या तटबंदीखालील खडकाचा भाग कोसळला; बुरूज ढासळण्याची भीती – maharashtra : pratapgad fort suffer rain damage

0
36
Spread the love

पुणे: दुर्गप्रेमींचे आवडते ठिकाण असलेल्या प्रतापगडाच्या माचीची वळणदार तटबंदी ही दुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार मानली जाते. गेले दोन दिवस महाबळेश्वर-प्रतापगड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाने माचीच्या तटबंदीतील एका बुरूजाखालच्या खडकाचा भाग निसटल्याने हा बुरूज कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.

गडाच्या महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच प्रतापगडाची इतिहासप्रसिद्ध माची आहे. या माचीची वळणदार तटबंदी आणि त्यात खुबीने बांधलेले बुरूज हे दुर्गस्थापत्यातले अभ्यासण्यासारखे काम आहे. जावळीचे खोरे जिंकल्यावर शिवछत्रपतींच्या आदेशानुसार स्वराज्याचे मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी गडाची बांधणी करून घेतली. अफजल खानाचा वध आणि त्यानंतर गडावर स्थापन केलेल्या श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदिरामुळे गडाचे इतिहासातले स्थान वेगळे आहे.

रोज रोज कशाला बोलता? सरकार पाडून दाखवाच; राऊतांचं भाजपला थेट आव्हान

गेले काही वर्षं लोकसहभागातून गडाच्या जतन-संवर्धनाचे कामही सुरू आहे. गडावर मशाल उत्सवही साजरा होतो. महाबळेश्वरला येणारे पर्यटकही गडाला भेट देतात. या पार्श्वभूमीवर गडाच्या संवर्धनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ‘यंदाच्या पावसात खडकाचा भाग निसटल्याने माचीच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही असाच खडकाचा भाग निसटला होता‌,’ अशी माहिती गडावरील रहिवासी आकाश मोरे यांनी दिली.

धक्कादायक! ड्रग्स तस्करीमध्ये BSF जवानाचा हात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

‘करोनानंतर सर्वप्रथम भारतच आपल्या पायावर उभा राहील’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)