Prime Minister of Nepal K P Sharma Oli Tweet On Amitabh Bachchan mppg 94 | नेपाळचे पंतप्रधान बिग बींसाठी करतायत प्रार्थना; म्हणाले…

1
77
Spread the love

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बींनी स्वत: ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. या ट्विटमुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. दरम्यान नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी ट्विटद्वारे बिग बींसाठी प्रार्थना केली आहे.

अवश्य पाहा – जयसाठी विरूची प्रार्थना! बिग बींना करोना झाल्यामुळे धर्मेद्र चिंतेत

अवश्य पाहा – बिग बींसाठी हेमा मालिनी यांनी केली प्रार्थना; म्हणाल्या…

“भारतातील महान अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा पुत्र अभिषेक बच्चन यांनी लवकरात लवकर बरं व्हावं. त्यांच्या तंदुरुस्तीसाठी मी इश्वराकडे प्रार्थना करतोय.” अशा आशयाचे ट्विट के. पी. शर्मा ओली यांनी केलं आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

करोना विषाणूचं संक्रमण सध्या वाढतच चाललं आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 5:29 pm

Web Title: prime minister of nepal k p sharma oli tweet on amitabh bachchan mppg 94Source link

1 COMMENT

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)