Prithviraj Chavan: Prithviraj Chavan: ‘मी मुख्यमंत्री नाही, राज्य कसं चालवायचं ते उद्धव ठाकरे ठरवतील’ – what prithviraj chavan said on cm uddhav thackeray’s decision on lockdown extension

0
48
Spread the love

मुंबई: ‘मी काही मुख्यमंत्री नाही. राज्य कसं चालवायचं याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकायचं की लोकनियुक्त पुढाऱ्यांचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल कुणीही बॅकसीट ड्रायव्हिंग करणं योग्य नाही,’ असं स्पष्ट मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

वाचा: महाराज अडकत चाललेत! आता कोर्टाची वारी करावी लागणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलैपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळं महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे. आतापर्यंत ही नाराजी फक्त काँग्रेसपुरती मर्यादित होती. मात्र, आता राष्ट्रवादीचे नेतेही नाराज असल्याचं सांगितलं जातं. आघाडीतील या कुरबुरी व लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत पृथ्वीराज यांनी आपलं मत मांडलं. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा: नातीनं आजीचं नाक कापलं; परेश रावल यांची प्रियांकांवर जहरी टीका

‘लॉकडाऊनच्या बाबत कुठलाही स्पष्ट निर्णय घेणं सोपं नाही. एका बाजूला रोजगार वाचवायचे आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणायची आहे आणि दुसरीकडं लोकांचे जीव वाचवायचे आहेत. हे धर्मसंकट आज जगासमोरच आहे. त्यामुळं निर्णयाच्या बाबतीत दोलायमान स्थिती आहे. काही ठिकाणी एका बाजूला तर काही ठिकाणी दुसरीकडं झुकण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढतेय. औषधांच्या बाबतीतही संभ्रम आहे. केंद्रानं राज्य सरकारवर जबाबदारी ढकलल्यामुळं राज्य सरकारं आपापल्या परीनं निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकदम ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कसा घेतला याबाबत संभ्रम नक्कीच आहे. आतापर्यंत आपण १५-१५ दिवसापुरता मर्यादित निर्णय घेत होतो. आता अचानक महिनाभर वाढला आहे. एकीकडं अनलॉक सुरू असताना अचानक ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय कशा प्रकारे घेतला गेला याबद्दल चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत त्यावर स्पष्टता येईल, असं पृथ्वीराज म्हणाले.

वाचा: ‘शिर्डीत कोणालाही पाठवू नका; अन्यथा गडबड होईल’

महत्त्वाचे निर्णय घेताना मुख्यमंत्री ठाकरे आपल्यासारख्या अनुभवी नेत्याचा सल्ला घेत नाहीत का या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘करोनाचं हे संकट अभूतपूर्व आहे. माझ्या कार्यकाळात किंवा इतर कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात असं संकट नव्हतं. आपण दुहेरी कचाट्यात अडकलो आहोत. त्यामुळं इतर कुणीही बॅकसीट ड्रायव्हिंग करू नये असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांना आम्ही काही सूचना करत असतो. तेही आमचा सल्ला घेत असतात. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. शेवटी खुर्चीत जो व्यक्ती बसलाय त्यालाच निर्णय घ्यावे लागतात, असं सांगत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळूनही घेतले.

वाचा: हे चित्र देशाच्या इभ्रतीला डाग लावणारे आहे? – शिवसेना

शरद पवार- मुख्यमंत्री भेट

आघाडीतील कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चर्चा होणार आहे. याबाबत विचारलं असता, ‘पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटी होत असतात. आजची भेट कशासाठी होतेय हे मला माहीत नाही. त्याबद्दल आत्ताच काही बोलणं योग्य होणार नाही,’ असंही पृथ्वीराज म्हणाले.

वाचा: जीएसबी मंडळ गणेशोत्सव साजरा करणार, पण…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)