Priya Berde joins NCP: … म्हणून प्रिया बेर्डे यांनी राजकारणासाठी ‘राष्ट्रवादी’ची केली निवड – popular marathi actress priya berde join ncp today

0
69
Spread the love

पुणे: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी बेर्डे यांना देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून प्रिया बेर्डे यांच्या राजकारणातील एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला. प्रिया बेर्डेयांच्यासोबत अनेक कलाकारांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला आहे.

राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा होती. आता राजकारणात प्रवेश झाल्यानंतर छान वाटतंय असं प्रिया बेर्डे म्हणाल्या. ‘लॉकडाउच्या काळात कलाकारांचे प्रचंड हाल झाले. यांच्यासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. माझ्या संस्थेच्यावतीनं शक्य ती मदत केली पण ती पुरेशी नव्हती. याकाळात राष्ट्रवादी पक्षानं कलाकारांच्या अनेक अडचणी समजून घेतल्या. त्यांना आर्थिक मदत केली, त्यांच्या अकाउंटमध्ये थेट रक्कम जमा केली ‘, असंही त्या म्हणाल्या. त्या

अमित साध म्हणतोय प्रेक्षकांना जे आवडतंय, तेच दिसतंय!
शरद पवार साहेबांना कलेची आणि कलाकारांची जाण आहे. त्यांच्याविषयी आदर आहे. लॉकडाउनच्या काळात लोक कलावंतांना देखील राष्ट्रवादीनं मोठी मदत केली. तीन हजार लोक कलावंतांना प्रत्येकी ३००० रुपये मानधन दिलं गेलं होतं. त्यामुळं राजकारणात येण्यासाठी राष्ट्रवादीची निवड केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.’कलाकारांसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात उतरले असून यापुढं विधान परिषद वगैरे असं काही डोक्यात नाही’, असं त्या म्हणाल्या.
Sharad Pawar: ‘मातोश्री’वर जाण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही: शरद पवार

प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या काही मागण्याही यावेळी सांगितल्या. राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना प्राधान्य देण्यात यावं. तसंच ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी आणि मालिकांची प्रत्येक शिफ्ट आठ तासांचीच असावी यासहीत अनके मागण्या प्रिया बेर्डे यांनी केल्या. तसंच मालिका कलाकारांना सध्या ९० दिवसांनंतर कामाचं मानधन मिळतं ते ३० दिवसांत मिळायला हवं असंही त्या म्हणाल्या.

या कलाकारांचाही झाला पक्ष प्रवेश

 • राजेश सरकटे, गायक
 • ओंकार केळकर, संगीतकार
 • सुधीर निकम, लेखक-दिग्दर्शक
 • माया जाधव, लावणी कलावंत
 • सुहासिनी देशपांडे, अभिनेत्री
 • शंकुतला नगरकर, लावणी कलावंत
 • सिध्देश्वर झाडबुके, अभिनेता
 • विनोद खेडकर, अभिनेता
 • संतोष साखरे, कार्यकारी निर्माता
 • मिलिंद अष्टेकर,
 • आशू वाडेकर, अभिनेता
 • संग्राम सरदेशमुख, अभिनेता
 • उमेश दामले, अभिनेते
 • संजय डोळे, लेखक-दिग्दर्शक
 • अर्चना नेवरेकर

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)