Procedure (SOP) for final year examination announced by UGC aau 85 |यूजीसीकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठीची कार्यपद्धती (SOP) जाहीर

0
31
Spread the love

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. त्यामुळे या गोंधळामध्ये अधिकच भर पडली आहे.

युजीसीने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार, परीक्षा हॉलमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बेंच रिकामा ठेवण्यात यावा, दोन विद्यार्थ्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असेल, एका वर्गात चार रांगा असतील यामध्ये त्यांच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या जागेची रिक्त जागा असेल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सोमवारी सुधारित मार्गदर्शकतत्वे जाहीर केली होती. या नव्या तत्वांनुसार विद्यापिठांमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यांत होतील असं सागण्यात आल आहे. म्हणजेच विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत. यापूर्वी अशीही बातमी आली होती की, युजीसीच्या एका समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याची शिफारिस केली होती. त्यावेळी असं मानलं गेलं होतं की, अंतिम वर्षाचा निकाल हा यापूर्वी घेण्यात आलेल्या सेमिस्टर किंवा आधी झालेल्या परीक्षा आणि इंटरनल असेसमेंटच्या आधारे लावण्यात येईल. मात्र, आता हे स्पष्ट झालं आहे की असं काहीही होणार नाही.

एप्रिल २०२० मध्ये यूजीसीने तज्ज्ञांची एक समिती नेमली होती. या समितीला परीक्षा आणि वर्षभराच्या शैक्षणिक कार्यक्रमावर चर्चा करणे आणि शिफारिश करणे होतं. समितीच्या अहवालाच्या आधारे युजीसीने शैक्षणिक वेळापत्रकासंबंधित नवी नियमावली २९ एप्रिल २०२० रोजी जाहीर केली होती.

यानंतर विशेतज्ज्ञांच्या या समितीने आग्रह धरला की, वाढत्या करोनाच्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या नियमावलींचं विश्लेषण करण्यात येऊन नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यासंबंधी सूचना कराव्यात.

दरम्यान, या समितीने आपला अहवाल युजीसीकडे सोपवला आहे. त्यांनतर सोमवारी यावर चर्चा झाली आणि युजीसीने याला मंजुरी दिली. त्यामुळे आता नव्या नियमावलीनुसर,२९ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या नियमावलीच प्रभावी राहिल. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असेही युजीसीने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 4:12 pm

Web Title: procedure sop for final year examination announced by ugc aau 85


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)