Pune Mayor Murlidhar Mohol discharged from the hospital scj 81 svk 88 | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना डिस्चार्ज

0
28
Spread the love

 

पुणे प्रतिनिधी 

महापौर मुरलीधर मोहोळ यांचा करोना बाधित असल्याचा रिपोर्ट ४ जुलै रोजी आल्यानंतर त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. महापौरांच्यामध्ये करोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्याने, त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. तर १५ जुलै पर्यंत होम क्वारंटाइन राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे दिली.

पुणे शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून शहराची २४ हजाराहून अधिक रुग्ण संख्या झाली आहे. त्याच दरम्यान शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना ४ जुलै रोजी करोना झाल्याचा रिपोर्ट आला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची देखील तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काहीजण बाधित देखील आढळले असून त्या सर्वांवर उपचार आहे. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर लवकरात लवकर बरे होण्याचे मेसेज सोशल मीडियावर पाहण्यास मिळाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या तब्येतची विचारपूस देखील फोनद्वारे संवाद साधून केली आहे.

त्याच दरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून १५ जुलैपर्यंत होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरनी दिला आहे. तसेच करोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने, घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती ट्‌विट करून दिली. तसेच यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्‍टर्स आणि टीमचे त्यांनी आभार मानले असून क्वारंटाइननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेन, याचे नक्कीच समाधान आहे, असे त्यांनी ट्‌विटमध्ये केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 11:01 pm

Web Title: pune mayor murlidhar mohol discharged from the hospital scj 81 svk 88


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)