Pune news: पुण्यातील वकिलानं ७५ वर्षीय वडिलांना दिलं अनोखं बर्थ-डे गिफ्ट – Pune Man Climbs Sinhagad Seven Times In A Day On The Occasion Of His Fathers Birthday

0
19
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी भेट द्यायची म्हणून पुण्यातील दुर्गप्रेमी अॅड. मारुती गोळे यांनी एका दिवसात सलग सात वेळा सिंहगड सर केला. या उपक्रमासाठी त्यांना सकाळी ९ ते रात्री ८ असा ११ तासांचा कालावधी लागला.

वाचा: फेरीवाल्याचं काय होणार?; राज्य सरकारनं कोर्टात स्पष्टच सांगितलं

‘माझे वडील बबनराव गोळे हे हिंदवी स्वराज्याचे पायदळप्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे तेरावे वंशज आहेत. त्यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. कुस्ती, शेती अन् प्रपंच यातच त्यांनी आयुष्याचा आनंद मानला. केंद्र सरकारच्या डीआरडीओ या पाषाण येथील संस्थेत नोकरी केली. २००५ मध्ये निवृत्त होऊन पुन्हा ते शेतीकडे वळले. आम्हा सर्व भावंडाना उच्च शिक्षण दिले. आयुष्यभर त्यांनी शेती अन् कुस्ती यांचा ध्यास जपलाय. त्यांचा वाढदिवस ७ जुलै म्हणून सात वेळा सिंहगड सर करून ही भेट त्यांना दिली,’ असे गोळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

पालकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहणे गरजेचे आहे. त्याला इतिहास आणि उत्तम आरोग्याची जोड दिल्यास नव्या पिढीला काही चांगले देता येणे शक्य आहे

अॅड. मारुती गोळे

या उपक्रमासाठी त्यांना दिग्विजय जेधे, इतिहास संशोधक अशोक सरपाटील, मनोज शेळके, राजाभाऊ तिखे, पुणे एव्हिएशन कॉलेजचे भारत पाटील, दिनेश बामनकर, अभिजित लोंढे यांनी सोबत करत शुभेच्छा दिल्या. या मोहीमेत सर्वांत कमी वेळ ३९ मिनिटे, तर जास्त वेळ ४५ मिनिटे नोंदली गेली. हिंदवी स्वराज्याचे पायदळप्रमुख नरवीर पिलाजी गोळे यांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही गोळे यांनी सांगितले.

वाचा: हॉटेल, लॉज उद्यापासून… मेट्रोचे टाळे कधी उघडणार?

‘पालकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहणे गरजेचे आहे. त्याला इतिहास आणि उत्तम आरोग्याची जोड दिल्यास नव्या पिढीला काही चांगले देता येणे शक्य आहे,’ अशी भावना अॅड. मारुती गोळे यांनी व्यक्त केली.

Live: नगरमध्ये ७५ वर्षीय आजीसह ३६ जणांची करोनावर मात

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)