pune news News : Murlidhar Mohol: पुण्यातून मोठी बातमी; महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना – pune mayor murlidhar mohol tests positive for covid-19

0
21
Spread the love

पुणे : पुण्याला करोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पालिका यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या लढ्याचे नेतृत्व करत असलेले पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाच आता करोनाने गाठले आहे.

मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली असून याबाबत खुद्द मोहोळ यांनीच जाहीरपणे माहिती दिली आहे. मोहोळ यांनी आज सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी एक ट्विट केलं असून त्यात आपल्याला करोना संसर्ग झाल्याचे नमूद केले आहे. थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड १९ टेस्ट केली होती. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे मोहोळ यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

करोना झाला असला तरी यातून लवकरच बरा होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ‘माझी प्रकृती आता स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेन. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन’, अशा शब्दांत त्यांनी पुणेकरांना आश्वस्त केले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)