Pune robbery: पुण्यात बंटी-बबलीचा धुमाकूळ; दिवसा रेकी, रात्री करायचे घरफोड्या – pune police arrested bunty and babli who burglaries in pune pimpri area

0
34
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, पुणे: दिवसा घर स्वच्छ करण्यारे साहित्य विकण्याच्या बहाण्याने फिरून रेकी करत घरफोड्या करणाऱ्या बंटी आणि बबलीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत ४५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

रामा पापा जाधव उर्फ रामा सोनाजी कांबळे (वय २५, रा. शिवाजीनगर), उषा रामा कांबळे (वय २८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक दुचाकी, गुन्हा करण्यासाठी लागणारी कटावणी, एक स्क्रू ड्रायव्हर असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी लष्कर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, कामशेत टाकवे या ठिकाणी घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी व कर्मचारी सराईत गुन्हेगाराची चौकशी करत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली, की कॅम्प परिसरात रामा व उषा हे घरफोडी करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्या दोघांना अटक करण्यात आली.

औरंगाबादमध्ये रात्रीच्या वेळी सुरू होती दारूची वाहतूक, त्याचवेळी…

बहिणीच्या लग्नासाठी तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल!

आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात २६ पेक्षा जास्त घरफोड्या केल्या आहेत. दोघेही बंटी व बबली नावाने प्रसिद्ध आहेत. आरोपी हे भरदिवसा साफसफाई करण्यासाठी लागणारे झाडू, ब्रश आदी साहित्य घेऊन विविध सोसायट्यांमध्ये फिरत असत. ज्या सोसायट्यांमध्ये फ्लॅट बंद आहेत, त्याची रेकी करून घरफोड्या करत होते. या दोघांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांची ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पुणे: करोनाबाधितानं क्वारंटाइन सेंटरमध्येच घेतला गळफास

पायातील चपलांमुळं ‘त्या’ पोलिसाला खावी लागली तुरुंगाची हवा

लूटमार करणारे आरोपी नगरमध्ये जेरबंद

संचारबंदीच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर गुन्हे वाढल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यात अडवून अनेकांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर अहमदनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लुटारूंच्या विरोधात धडक कारवाई केली आहे. शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

औरंगाबाद: पैठणमध्ये पोलीस पथकावर हल्ला; आरोपींना जामीन नाहीच!

खळबळजनक! शेजाऱ्याने बलात्कार केल्यानंतर तरुणीने स्वतःला पेटवून घेतले

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)