Rahul Gandhi attacks Modi: पंतप्रधान मोदींना ‘हे’ कधीच समजणार नाही; राहुल गांधींचा टोला – rahul gandhi attacks pm narendra modi saying modi will never understand this

0
27
Spread the love

नवी दिल्ली: देशाशी संबंधीत मुद्द्यांवरून काँग्रेस आणि केंद्रात सत्तेत असेलल्या भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेले ‘वाक्-युद्ध’ शमण्याचे नाव घेत नाही आहे. चीनचा मुद्दा असो की मग करोना विषाणूच्या उद्रेकाबाबतचा मुद्दा असो काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षाने देखील चीन प्रकरण आणि आणीबाणीवर काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांविरोधात वक्तव्ये केली आहेत. आज केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणत्या संदर्भात टीकास्त्र सोडले आहे ते त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट झालेले नाही. मात्र, गांधी कुटुंबाशी संबंधित तीन ट्रस्टची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने आज बुधवारी दिल्यानंतर त्याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हा निशाणा साधला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘जग आपल्यासारखे आहे असे श्री. मोदी यांना वाटते आहे. त्यांना वाटते की प्रत्येकाची किंमत आहे किंवा त्यांना घाबरवले जाऊ शकते. मात्र जे लोक सत्यासाठी लढत आहेत त्यांची कोणतीही किंमत नसते, किंवा त्यांना घाबरवता येणे शक्य नाही, हे ते कधीही समजू शकणार नाहीत.’

गांधी कुटुंबाच्या तीन संस्थांच्या चौकशीचे आदेश; गृह मंत्रालयाची समिती स्थापन

वाचा: तेव्हा भाजप आणि मीडियाने माझी खिल्ली उडवली; राहुल गांधींचे टीकास्त्र
गांधी कुटुंबीयांशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या विरोधात वित्तीय व्यवहारात झालेल्या कथित अनियमिततेसंदर्भात चौकशी केली जाईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या तीन संस्थांनी वित्तीय व्यवहाराशी संबंधित नियमांचे कथित उल्लंघन केल्या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे आंतर-मंत्रालयीन समितीचे गठन केले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सकाळी ट्विट करत माहिती दिली आहे.

वाचा: मोदी सरकारच्या ‘या’ अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होणार; राहुल गांधींचा निशाणा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)