Raigad district received heavy rainfall msr 87|रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, २४ तासांत ६० मिलिमीटर पाऊस

0
27
Spread the love

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टीच्या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन , म्हसळा तालुक्यात पावसाचा अधिक जोर दिसत आहे. परिणामी जिल्हयातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

तर, भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात २४ तासात ६०मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागरिकांना सतर्क राहण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान मुंबईत देखील आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ’अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली त्यानंतर आज सकाळी देखील पावासाची रिपरिप सुरू झाली.. संततधारेमुळे शहराच्या अनेक भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचले. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.

दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांसह संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्याच्या बहुतांश भागात सध्या पाऊस हजेरी लावतो आहे. राज्यातील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे कोकणपासून विदर्भापर्यंत विविध ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 1:05 pm

Web Title: raigad district received heavy rainfall msr 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)