Rajesh Tope: Rajesh Tope करोनावर भारतीय लस; आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती – rajesh tope shares important information on covaxin

0
31
Spread the love

मुंबई:करोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर पुढील सोपस्कार पार पाडले जाणार असून भारतात निर्मित होणाऱ्या या लशीबाबत आपण आशावादी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. ( Rajesh Tope On Covaxin )

वाचा: भारताने बनवली करोनावरील स्वदेशी लस; १५ ऑगस्टला लॉन्च करण्याची तयारी

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘आज यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारपणे महत्त्वाच्या १३ ते १४ हॉस्पिटल्समध्ये या लशीबाबत क्लिनिकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ७ जुलैपर्यंत या क्लिनिकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

वाचा: ‘या’ सत्ताधारी आमदाराला करोना; कार्यकर्ते, अधिकारी हादरले!

या लसीबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

करोना ‘कोव्हॅक्सीन’ रोखणार?

कोव्हॅक्सीन या नावाची ही लस आहे. ही लस हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या फार्मास्युटिकल कंपनीने तयार केली आहे. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद संयुक्तपणे ही लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. नुकतीच या लशीला मानवावर प्रयोग करण्यासाठी परवानगी देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने जारी केलेल्या पत्रानुसार, या लशीचा मानवावरील प्रयोग ७ जुलै या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. या नंतर जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्यदिनी ही लस लॉन्च केली जाणार आहे.

वाचा: राज्यात आज उच्चांकी ६ हजार नव्या रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)