Ranbir Kapoor sister Riddhima Kapoor refutes rumours that he Neetu Singh have tested Covid 19 positive | रणबीर व नीतू कपूर यांना करोनाची लागण? बहीण रिधिमा म्हणते…

0
65
Spread the love

अभिनेता रणबीर कपूर व त्याची आई नीतू कपूर यांना करोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. यावर रणबीरची बहीण रिधिमा कपूर सहानी हिने खुलासा केला आहे. ‘लक्ष वेधून घेण्यासाठी असं वृत्त दिलं आहे का? कमीतकमी वृत्त खरं आहे की खोटं ते तरी तपासून घ्या. आम्ही सगळे ठीक आहोत. अफवा पसरवणं थांबवा’, असं रिधिमाने इन्स्टाग्रामवर लिहिलंय. रणबीर व नीतू कपूर यांना करोनाची लागण झाल्याचं एकाने ट्विट केलं. त्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत रिधिमाने अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

‘रणबीर कपूर, नीतू कपूर आणि करण जोहर यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने रिधिमा कपूरच्या पार्टीला हजेरी लावली होती,’ असं ट्विट एकाने केलं. त्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत रिधिमाने चर्चा खोटी असल्याचं स्पष्ट केलं.

आणखी वाचा : आराध्या बच्चनचाही करोना रिपोर्ट आला समोर

शनिवारी रात्री बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवर दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचीही करोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेक बच्चनचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन व आराध्या बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. सध्या बिग बी व अभिषेक यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:09 am

Web Title: ranbir kapoor sister riddhima kapoor refutes rumours that he neetu singh have tested covid 19 positive ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)