rasika Sunil in mazya navryachi bayko: काय म्हणता… ‘माझ्या नवऱ्याची बायको’मालिकेत पुन्हा दिसणार जुनी शनाया? – actress rasika sunil will replace again isha keskar for shanaya in mazya navryachi bayko

0
38
Spread the love

मुंबई: गेल्या साडेतीन महिन्यांपासून मराठी मालिकांचे जुने भाग पाहून प्रेक्षकांनीही कंटाळा आला आहे. आता शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही मालिकांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत देखील एक महत्त्वाचा बदल प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मालिकेत शनाया या पात्राची नेहमीच चर्चा असते. आता पुन्हा एकदा हे पात्र चर्चेत आलं आहे. मालिकेत सुरुवातील अभिनेत्री रसिका सुनील हिनं हे पात्र साकारलं होतं. मात्र, शिक्षणासाठी परदेशात गेल्यानं तिनं ही मालिका सोडली होती. तिच्यानंतर शनायाच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर हिची एन्ट्री झाली. तिनं साकारलेली शनाया देखील प्रेक्षकांनी तितकीच आवडली होती. परंतु काही कारणामुळं ईशा मालिका सोडणार असल्याचं कळतंय. त्यामुळं पुन्हा एकदा शनायाच्या भूमिकेत रसिका दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

काही महिन्यांपूर्वी ईशानं ‘गर्लफ्रेंड’चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. या चित्रपटात ईशा हट के लूकमध्ये दिसली होती.‘मी टीव्ही किंवा चित्रपटात मला आवडेल अशाच भूमिका निवडण्यावर भर देणार आहे, त्यामुळे माध्यमाचा प्रश्नच येत नाही,’ असं ईशानं सांगितलं आहे.अभिनेता ऋषी सक्सेनासोबतच्या नात्यामुळे सोशल मीडियावर ती सतत चर्चेत असते.

… म्हणून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ नाशिकला रवाना

दरम्यान, ‘माझ्या नवऱ्याची बायको’चं चित्रीकरण आता नाशिकमध्ये होणार आहे. तूर्तास पाच-सहा मुख्य कलाकारांसह मालिकेचं शूटिंग सुरू होणार आहे.यापूर्वी हे शूटिंग ठाण्याला होत होतं. पण, ठाण्यातल्या ज्या इमारतीमध्ये या मालिकेचं चित्रीकरण व्हायचं तिथं आता परवानगी मिळत नाहीय. त्यामुळं हे शूटिंग मुंबईबाहेर म्हणजेच नाशिकजवळच्या इगतपुरीला हलवण्यात आलं आहे. या भागात एक संपूर्ण रिसॉर्ट भाड्यानं घेण्यात आलं असून, कलाकारांसह मालिकेची संपूर्ण टीम सध्या तिथेच राहून चित्रीकरण करणार आहे. सोमवारपासून मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, एपिसोड्सचं एडिटिंगचं कामही तिथेच होणार असल्याचं कळतंय. त्याबरोबरच मुंबई, ठाण्यात ‘भाभीजी घर पर है’, ‘मोलकरीण बाई’ यासारख्या अनेक हिंदी-मराठी मालिकांच्या चित्रीकरणालादेखील सुरुवात झाली आहे.

लॉकडाउननंतर चित्रीकरणाला सुरुवात होत असताना, कमीत कमी युनिटमध्ये काम करणं बंधनकारक आहे. त्यामुळे सेटवर सध्या रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) आणि केशरचनाकार यांची (हेअर आर्टिस्ट) टीम नसेल. कलाकारांच्या मदतीसाठी एखाद-दुसरा मेकअप किंवा हेअर आर्टिस्ट असतील. त्यामुळे कलाकार हातात मेकअपचा ब्रशन घेऊन स्वत:च स्वत:चा मेकअप करणार आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)