Ratan tata group donates 10 crores to Thackeray government to fight corona scj 81 | ठाकरे सरकारच्या मदतीला पुन्हा धावले टाटा, प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी, १०० व्हेंटिलेटर्स

0
29
Spread the love

रतन टाटा आणि त्यांचं सामाजिक कार्य हे कायमच वाखाणलं गेलं आहे. करोनाच्या संकटात टाटा समूह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारच्या मदतीला धावून गेले आहेत. १० कोटींचं अर्थसहाय्य हे टाटा उद्योगसमूहाकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेला देण्यात आलं. इतकंच नाही तर १०० व्हेंटिलेटर्स आणि २० अॅम्ब्युलन्सचीही मोलाची मदत टाटांनी केली.

समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने करोनाशी लढा देताना टाटा समूहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण करोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 10:22 pm

Web Title: ratan tata group donates 10 crores to thackeray government to fight corona scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)