Ratnagiri district aid has not reached, many villages are still in darkness abn 97 | कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात

0
26
Spread the love

सतीश कामत / हर्षद कशाळकर

रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्य़ांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला त्याला शुक्रवारी महिना पूर्ण होत आहे, तरी या कालावधीत शासकीय मदत मिळालेली नाही. अनेक गावांमधील वीजपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. घरांचे नुकसान झालेल्यांना काही प्रमाणात मदत मिळाली असली, तरी बागायतदारांच्या हाती काहीच लागलेले नाही.

‘निसर्ग’ चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली आणि गुहागर या दोन तालुक्यांना जोरदार तडाखा दिला. तेव्हा अनेक गावांमधील कोलमडलेला वीजपुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. रायगड जिल्हाही अजून पूर्णपणे सावरू शकलेला नाही. शासनाकडून घरांच्या नुकसानाची मदत पोहोचली असली तरी बागायतदारांच्या झोळीत महिन्याभरानंतरही काहीच पडलेले नाही. नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी मदत सर्वत्र मिळालेली नाही.

कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीसाठी निकषात बदल करून मदतीत वाढ करण्यात आली. नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, असा दिलासा देण्याचा प्रयत्न रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

दिलासा नाहीच..

रत्नागिरी जिल्ह्य़ात शेती-बागायतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मदतीची रक्कम अगदीच तुटपुंजी असून तीही फारशी पोहोचलेली नाही. रायगडमध्येही हीच परिस्थिती आहे. तेथील १९० गावांचा वीजपुरवठाही खंडित आहे. संतप्त नागरिकांनी मदत नको पण वादळाने उन्मळून पडलेल्या वृक्षांचा कचरा साफ करून द्या, असे सरकारी अधिकाऱ्यांना सुनावले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:18 am

Web Title: ratnagiri district aid has not reached many villages are still in darkness abn 97Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)