Responsibility for health check up on society members zws 70 | सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांवर आरोग्य तपासणीची जबाबदारी

0
66
Spread the love

सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासण्याच्या पालिकेच्या सूचनांना विरोध

मुंबई : गृहनिर्माण संस्थांतील कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी दर आठवडय़ाला सोसायटीतील रहिवाशांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासून त्याच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत. मात्र, या जबाबदारीमुळे आपणच करोनाबाधितांच्या संपर्कात येण्याची भीती असल्याने अनेक सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांनी या आदेशांची अंमलबजावणी करण्यास विरोध केला आहे.

महापालिकेच्या एल विभाग अधिकाऱ्यांनी कुर्ला व परिसरातील अनेक सोसायटय़ांना पत्र पाठवून थर्मामीटर गन व पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. सोसायटीतील प्रत्येक सदस्याचे तापमान व ऑक्सिजन पातळी दर आठवडय़ाला नोंदविली जावी. ताप असेल किंवा ९५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन पातळी असेल, तर सदस्याला महापालिका दवाखान्यात पाठवावे किंवा पालिका कार्यालयास कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मात्र त्यांचे पालन करणे अशक्य असून त्यामुळे करोना प्रसाराचा धोका असल्याची भीती शिवसृष्टी सोसायटीचे अध्यक्ष सलील रमेशचंद्र यांनी व्यक्त केली. सोसायटीने स्थानिक नगरसेवकांनाही पत्र लिहिले आहे. अनेक सोसायटय़ांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना जिने चढून घरोघरी जाणे शक्य नाही. बहुसंख्य इमारतींमध्ये लिफ्ट नाहीत. त्याचबरोबर ते कोणाच्याही घरी गेल्यास करोनाची लागण त्यांनाही होऊ शकते. सोसायटी सुरक्षा रक्षकांनाही हे तपासून अचूक नोंदी ठेवणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने हे निर्देश मागे घ्यावेत, अशी सोसायटय़ांची विनंती असल्याचे रमेशचंद्र यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 2:47 am

Web Title: responsibility for health check up on society members zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)