Sachin Pilot claims Gehlot govt is in minority dmp 82| अशोक गेहलोत सरकार अल्पमतात, मला ३० आमदारांचा पाठिंबा – सचिन पायलट

0
26
Spread the love

राजस्थानात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. अशोक गेहलोत यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. पक्षामध्ये नाराज असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून हा दावा करण्यात आला आहे.

आपल्याकडे पक्षाच्या ३० पेक्षा जास्त आमदारांचा, काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा त्यांनी दावा केला आहे. सोमवारी सकाळी जयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांच्यासाठी संदेश सोडला आहे असे पांडे यांनी संगितले. पीटीआयशी ते बोलत होते.

राजस्थानमधल्या घडामोडींची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना माहिती देण्यात आली आहे. चौकशीला सर्वांनी सहकार्य करावे, असे पांडे यांनी सांगितले. भाजपा राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात ते यशस्वी होणार नाही असे अविनाश पांडे म्हणाले.

‘आमच्यातील वाद विकोपाला’; अहमद पटेलांच्यासमोर सचिन पायलट यांनी सोडलं मौन
राजस्थानातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. सचिन पायलट यांनी अहमद पटेल यांना भेटून आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेल्याचे त्यांनी सांगितले. अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार समजले जातात.

सचिन पायलट यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेहलोत यांच्याबद्दलचा तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका सूत्रांने सांगितले. सचिन पायलट यांनी काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते के.सी.वेणूगोपाल यांची सुद्धा भेट घेतली. गेहलोत आणि पायलट यांच्यामध्ये फारसे सख्य नाही हे पक्षात सर्वांनाच माहित आहे. २०१८ साली जेव्हा काँग्रेसने राजस्थान विधानभा निवडणुकीत २०० पैकी १०७ जागा जिंकल्या, तेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. सचिन पायलट मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम होते. त्यावेळी तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पायलट यांची समजूत काढून उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना राजी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 10:12 pm

Web Title: sachin pilot claims gehlot govt is in minority dmp 82



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)