Salman khan ex manager Police inquiries about sushant singh rajput death mppg 94 | सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सलमानवर संशय? पोलिसांनी केली एक्स मॅनेजरची चौकशी

0
25
Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. परिणामी पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. आतापर्यंत ३४ लोकांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सलमान खानची एक्स मॅनेजर रेशमा शेट्टी हिची देखील पोलिसांनी चौकशी केली.

अवश्य पाहा – सलमानचं ‘सल्लू’ हे नाव कोणी ठेवलं?; भाईजानने सांगितला आपल्या नावाचा अजब किस्सा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी तब्बल पाच तास रेशमाची चौकशी केली. या चौकशीत तिने नेमकं काय सांगितलं याबाबत पोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. परंतु रेशमाची चौकशी करणं अत्यंत महत्वाचं होतं असं पोलिसांनी सांगितलं. कारण आजवर तिने अक्षय कुमार, संजय दत्त आलिया भट्ट यांसारख्या अनेक कलाकारांसाठी काम केलं आहे.

अवश्य पाहा – “मी भारतीय असल्यामुळे…”; अभिनेत्रीने सांगितला परदेशातील ‘तो’ धक्कादायक अनुभव

सुशांतच्या आत्महत्येमागे सलमान खानचा हात असल्याचे आरोप अनेकांनी केले आहेत. सलमानने त्याला बॉलिवूडमधून बाहेर काढण्याची धमकी दिली होती असेही म्हटले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात सलमानच्या मॅनेजरची चौकशी करण्यात आली. येत्या काळात सलमानची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 11:46 am

Web Title: salman khan ex manager police inquiries about sushant singh rajput death mppg 94Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)