sameer vidwans tweet on a man who threatening to rape agrima joshua over chhatrapati shivaji maharaj video controversy | ‘आज महाराज असते तर…’; अग्रिमाला बलात्काराची धमकी देणाऱ्यावर दिग्दर्शक संतप्त

0
29
Spread the love

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. मात्र यानंतरही सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. एका नेटकऱ्याने तिला बलात्काराची धमकीच दिली आहे. यावर ‘धुरळा’ चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आज महाराज असते तर याला जबर शिक्षा केली असती. याला ताबडतोब अटक आणि शिक्षा व्हायलाच हवी,’ असं ट्विट समीर विद्वांस यांनी केलंय.

संबंधित व्यक्तीने व्हिडीओ पोस्ट करत अग्रिमाचा बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वराचं हेच ट्विट शेअर करत समीर विद्वांस यांनी राग व्यक्त केला आहे. ‘त्या मुलीने माफी मागितली आहे. पण हा माणूस किती गलिच्छ आहे. सरळ सरळ बलात्काराची धमकी देतोय हा. त्या मुलीबद्दल इतकं गलिच्छ बोलून शेवटी महाराजांचं नावही घेतोय. लाजही वाटत नाही. आज महाराज असते तर याला जबर शिक्षा केली असती. याला ताबडतोब अटक आणि शिक्षा व्हायलाच हवी,’ असं ट्विट त्यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग केलंय.

काय आहे प्रकरण?

एका स्टँडअप शोदरम्यान अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर मनसेनंही विरोध करत संबंधित स्टुडिओची तोडफोड केली. या वादानंतर अग्रिमाने जाहीर माफी मागितली असून तो वादग्रस्त व्हिडीओसुद्धा हटवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:46 am

Web Title: sameer vidwans tweet on a man who threatening to rape agrima joshua over chhatrapati shivaji maharaj video controversy ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)