sanjay dutt remembered his parents on guru purnima 2020 says they were my first teacher ssj 93 | ‘आज ते माझ्यासोबत नाहीत,पण..’; गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना संजय दत्त भावूक

0
25
Spread the love

आयुष्यात योग्य मार्ग दाखविण्याचं काम गुरु करत असतात. त्यामुळेच या गुरुंचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी प्रत्येक जण गुरुंना वंदन करुन त्यांच्याप्रती असलेलं प्रेम, आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. यात अभिनेता संजय दत्तनेदेखील त्याच्या आई-वडिलांचा फोटो शेअर करुन त्यांना वंदन केलं आहे.

आपले आई-वडील हे प्रत्येकाच्या जीवनातील पहिले गुरु असतात, असं म्हटलं जातं. ते योग्यदेखील आहे. लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत प्रत्येक जण आपल्या आई-वडिलांकडून कोणती ना कोणती गोष्ट शिकतच असतो. त्यामुळे संजय दत्तनेदेखील त्याच्या पहिल्या गुरुंचा म्हणजे आई-वडिलांचा फोटो शेअर केला आहे.

“आज भलेही माझे आई-वडील माझ्यासोबत नाहीत. परंतु त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठिशी आहे. ते माझे पहिले गुरु होते. ज्यांनी आयुष्यात प्रत्येक पावलावर माझं मार्गदर्शन केलं. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”, असं म्हणतं संजय दत्तने गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, संजय दत्त सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेक वेळा तो फेसबुकवर त्याच्याविषयीचे अपडेट्स देत असतो. संजय अलिकडेच पानिपत आणि प्रस्थानम या चित्रपटात झळकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 4:14 pm

Web Title: sanjay dutt remembered his parents on guru purnima 2020 says they were my first teacher ssj 93Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)