Sanjay Raut and Devendra Fadnavis: ‘फडणवीसांना त्यांचा राजकीय अभ्यास पक्का करावा लागेल’ – Shivsena Mp Sanjay Raut Taunts Opposition Leader Devendra Fadnavis

0
52
Spread the love

मुंबई: ‘एक शरद आणि बाकी गारद’ हा शब्दप्रयोग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम केला होता. मार्मिकमध्ये लिहिलेल्या अग्रलेखात त्यांनी त्याबद्दल लिहिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना ते कदाचित माहीत नसावं. त्यांना राजकीय अभ्यासाचा बेस पक्का करावा लागेल,’ असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हाणला आहे. (Sanjay Raut taunts Devendra Fadnavis)

वाचा: शरद पवारांच्या मुलाखतीची इतकी चर्चा का? हे आहे खरं कारण

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सामना’साठी खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पवार हे सर्वच विषयांवर सडेतोड बोलले आहेत असं राऊतांचं म्हणणं आहे. मुलाखतीचे प्रोमो शेअर करताना राऊत यांनी ‘एक शरद, बाकी गारद’ असा मथळा एका व्हिडिओला दिला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना चिमटा काढला होता. ‘एक शरद, बाकी गारद’ असं म्हणून संजय राऊत यांना ‘उद्धव ठाकरे सुद्धा गारद’ असं सुचवायचं आहे का,’ असा प्रश्न केला होता. ‘बाळासाहेबांच्या वेळचा सामना आता राहिला नाही. आता सामनातून काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका मांडली जातेय. ‘एक नारद, शिवसेना गारद’ अशी अवस्था आहे,’ असं फडणवीस म्हणाले होते.

वाचा: ‘शरद पवार तेव्हा संसदेत मोदींच्या चेम्बरमध्ये का गेले होते?’

राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांच्या या टीकेला उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘एकेकाळी शरद पवार आणि शरद जोशी यांचा झंझावात पाहून बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी सर्वप्रथम ‘दोन शरद, बाकी गारद’ असा उल्लेख केला होता. त्यापैकी एक शरद आता नाहीत. त्यामुळं आम्ही आता ‘एक शरद, बाकी गारद’ असं म्हटलंय. फडणवीसांसह भाजप नेत्यांना हे माहीत नाही. ते तेव्हा राजकारणात नव्हते. आम्ही होतो. बाळासाहेबांसोबत काम करत होतो. त्यामुळं त्यांना राजकीय अभ्यासाचा बेस आणखी पक्का करावा लागेल,’ असा खोचक टोला राऊत यांनी हाणला.

वाचा: ‘सारथी’चं सूत्रे अजित पवारांनी स्वत:कडे का घेतली?

छगन भुजबळ यांनीही याच शब्दप्रयोगावरून काल फडणीवसांवर टीका केली होती. ‘शब्दच्छल करणाऱ्यांनाही शरद पवारांनी गारद केलं आहे,’ असं ते म्हणाले होते. आता राऊत यांनीही भाष्य केल्यामुळं या शब्दांवरून आणखी राजकीय टीकाटिप्पणी होण्याची शक्यता आहे.

Live: प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर

maharashtra times

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)