School shut no mid day meal children in Bihar village back to work selling scrap | शाळा आणि माध्यान्ह भोजन बंद झाल्याने चिमुकल्यांवर आली कचऱ्यातील भंगार विकण्याची वेळ

0
24
Spread the love

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अनेक गावांना करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. खास करुन लहान मुलांना या लॉकडाउनचा मोठा फटका बसला असून त्यांना शाळेमधून दिलं जाणारं माध्यान्ह भोजनही बंद झालं आहे. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने मागील काही महिन्यांपासून या मुलांना मिळणारं मोफत अन्न बंद झालं आहे. शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्ग मुलांना रोज पौष्टीक भोजन दिले जायचे. मात्र आता करोना लॉकडाउनमुळे हे माध्यान्ह भोजन बंद झाल्याने मुलांवर कचरा गोळा करण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण २०१५-१६ नुसार बिहारमधील ४८.३ टक्के मुलांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होत नसल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यातील ४३.९ टक्के मुलं कुपोषित आहेत असंही या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. राष्ट्रीय स्तरावरील ही आकडेवारी ३८.४ टक्के आणि ३५.७ टक्के असताना बिहारमधील हा आकडा जास्त आहे. त्यातच आता माध्यान्ह भोजन योजना बंद पडल्याने या मुलांच्या पोषणाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची चिन्ह दिसत आहेत.

येथील मुसाहारी टोला भागामध्ये मागास समाजातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील बहुतांश मुलं ही सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतात. याच ठिकाणी राहणारे दीनू मांझी यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी राहणाऱ्या लोकांकडे दोनच काम आहेत, पहिले म्हणजे कचरा गोळा करणे आणि दुसरं भीक मागणे. लॉकडाउनमुळे या भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबासमोर उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलं शाळेत जात नसल्याने आता पोट भरण्यासाठी त्यांना कचरा गोळा करावा लागत आहे. कचऱ्यातील प्लॅस्टीक आणि लोखंडाच्या वस्तू वेचून त्या भंगारच्या दुकानात विकून ही मुलं पोट भरण्यासाठी पैसे कमवत आहेत. महिन्याभरापूर्वी काही सरकारी अधिकारी या भागामध्ये रेशन कार्ड असणाऱ्या पाच रुपये किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो डाळ असं धन्नधान्य वाटप करुन गेले. त्यानंतर कोणीही सरकारी अधिकारी येथे फिरकला नाही असं येथील स्थानिक महिलेने ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं.

यासंदर्भात जिल्हाधिकारी प्रवण कुमार यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता माध्यान्ह भोजन योजनेसाठी वापरण्यात येणार निधी हा मुलांच्या जवळच्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवण्यात आल्याची माहिती दिली. मात्र लोकांनी अशाप्रकारचा कोणताही निधी आम्हाला मिळाला नसल्याचे म्हटले आहे. बाबडिला येथील एका शाळेतील मुख्यधापकांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काही प्रमाणात निधी देण्यात येत होता. तो निधी मुलांच्या जवळच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पाठवला जायचा. मात्र त्यानंतर निधी आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 9:00 am

Web Title: school shut no mid day meal children in bihar village back to work selling scrap scsg 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)