sharad pawar interview by sanjay raut part two | Video: एक शरद, सगळे गारद…!; पाहा मुलाखतीचा दुसरा भाग

0
73
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित होणार आहे. पवारांनी ‘सामना’ला नुकतीच एक विशेष मुलाखत दिली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून  ही मुलाखत घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून राऊत यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन या मुलाखतीचे प्रोमो पोस्ट करण्यात येत होते. शनिवारी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागामध्ये पवारांनी करोनापासून ते राज्यातील राजकारणासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. आजच्या मुलाखतीमध्ये पवार राज्यातील सरकराच्या प्रगतीपुस्तकासंदर्भात बोलणार असल्याचे समजते. सकाळी नऊ वाजता ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे. एकूण तीन भागांमध्ये ही मुलाखत असून एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली ती प्रदर्शित करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता पहिल्यांदाच राऊत यांनी संपादक म्हणून ठाकरे कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीची अशी प्रकट मुलाखत घेतली आहे.

पहिल्या भागात विरोधकांचा समाचार घेण्याबरोबरच करोनावर भाष्य करणारे पवार या मुलाखतीमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:29 am

Web Title: sharad pawar interview by sanjay raut part two scsg 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)