Sharad Pawar: Sharad Pawar: ‘आज देशाला मनमोहन सिंगांची गरज आहे’ – india needs one manmohan singh today, says sharad pawar while talking about economy after corona

0
23
Spread the love

मुंबई: ‘नव्वदच्या दशकात देशावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं काम तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी केलं. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पाठिंब्यानं त्यांनी नेहमीची चौकट सोडून निर्णय घेतले आणि अर्थव्यवस्था सावरली. आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे,’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. (Sharad Pawar says India needs one Manmohan Singh today)

वाचा: तुम्ही मोदींचे गुरू आहात? शरद पवार हसले आणि म्हणाले…

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना‘साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम, केंद्र सरकारच्या कारभाराची पद्धत आणि भारत-चीनच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटाबाबत पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी काही जाणकारांची मदत घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक-दोनदा सर्वपक्षीय नेत्यांशी बोलणी केली आहेत. पण या संकटाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर एकाच पक्षाच्या विचारानं उपाय शोधता येईल अशी भूमिका घेऊन चालणार नाही. ज्यांची ज्यांची मदत घेता येईल, त्यांची मदत घ्यायला हवी. मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक लोकांना अशा संकटात काम करण्याचा अनुभव नाही. खरंतर तो आम्हालाही नाही. पण या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वांची साथ घेण्याच्या बाबतीत सरकार कमी पडतेय,’ असं पवार म्हणाले.

वाचा: ‘बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये हा फरक आहे’

याच अनुषंगानं बोलताना पवारांनी देशातील इतर अर्थमंत्र्यांच्या कामाची आठवण सांगितली. ‘देशासमोर जेव्हा संकटाचे प्रसंग येतात तेव्हा जो एक प्रकारचा संवाद लागतो तो सध्या दिसत नाही. प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना तासन् तास इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत. त्यांची मतं घेत. आता इतरांची मतं घेतली जातात की नाही माहीत नाही. वेगळ्या विचाराच्या लोकांना तिथं प्रवेश आहे असं दिसत नाही. कुणाशी चर्चा होत असेल तर त्याचा परिणाम कुठं दिसत नाही,’ असंही पवार म्हणाले. ‘काही लोकांच्या कामाची पद्धत असते. पण मोदींनी काही जाणकार लोकांची मदत घेऊन पावलं टाकायला हवी. ते नक्कीच सहकार्य करतील,’ असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

maharashtra times

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)