Shivsena Sanjay Raut Tweet Teaser of Interview with NCP Chief Sharad Pawar sgy 87 | ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल की हेडमास्तर? काय म्हणतात शरद पवार?

0
21
Spread the love

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार असल्याचं अनेकदा बोललं गेलं आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांच्याकडे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल असून पडद्यामागून ते सरकार चालवत असल्याचंही अनेकदा विरोधकांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी अनेकदा हे दावे फेटाळून लावले आहेत. दरम्यान शरद पवारांची नेमकी भूमिका किंवा काय मत आहे याचा उलगडा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून होणार आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी मुलाखतीचा एक टिझर शेअर केला असून यामध्ये त्यांनी शरद पवारांना ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर शरद पवारांनी काय उत्तर दिलं असेल याचा उलगडा मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 8:30 am

Web Title: shivsena sanjay raut tweet teaser of interview with ncp chief sharad pawar sgy 87



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)