Shocking The JCB driver attempting to crush the person down the bucket Watch the video aau 85 |धक्कादायक! जेसीबी चालकाचा व्यक्तीला बकेटखाली चिरडण्याचा प्रयत्न; पाहा Video

0
67
Spread the love

हुज्जत घातली म्हणून जेसीबी चालकाने एका व्यक्तीला जेसीबीच्या बकेटखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणातील मुलूगू येथे ही घटना घडली आहे. एएनआयने याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओत एक जेसीबी चालक झाडाखाली थांबलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर जेसीबीचं बकेट नेऊन त्या व्यक्तीला त्याखाली चिरडण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. तसेच आणखी एकदा त्याने संबंधित व्यक्तीला जेसीबीच्या बकेटने जोरात धक्का देऊन खाली पाडल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे. संबंधित व्यक्ती दारुच्या नशेत असल्याने त्याची जेसीबी चालकासोबत शाब्दिक चकमक सुरु होती. यातूनच ही घटना घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळून येते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेलंगणा पोलीस जेसीबी चालकाचा शोध घेत असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे. मंगापेटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितले की, “पीडित व्यक्ती दारुच्या नशेत होता तसेच त्याचा जेसीबी चालकाशी वाद सुरु होता. या वादातून जेसीबी चालकाने त्याला मारले. याप्रकरणी जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” मंगळवारी, ७ जुलै रोजी घडलेली ही घटना थरकाप उडवणारी आहे.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे अशाच प्रकारे घडलेल्या एका घटनेत एका बैलाला एका जेसीबी चालकाने जेसीबीखाली चिरडून ठार मारले होते. तर पुण्यातच एघडलेल्या दुसऱ्या एका घटनेत खेळताना सार्थक नावाच्या लहान मुलाचा बॉल जेसीबीच्या बकेटमध्ये पडला असताना हा बॉल काढण्यासाठी तो बकेटवर चढला. त्याचवेळी जेसीबी चालकाने जेसीबी सुरु करुन बकेट वरखाली करुन त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे हा चिमुकला घाबरुन गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 2:21 pm

Web Title: shocking the jcb driver attempting to crush the person down the bucket watch the video aau 85Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)