sourav ganguly: सौरव गांगुलीचं बीसीसीआय अध्यक्षपद येऊ शकते धोक्यात, ‘हे’ आहे कारण… – sourav ganguly’s bcci president post will be in trouble because of conflict of interest issue

0
28
Spread the love

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे क्रिकेट ठप्प पडलेले आहे. पण दुसरीकडे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे पद धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयसाठी ही कठीण परिस्थिती आहे. कारण करोना व्हायरसमुळे क्रिकेट हे पूर्णपणे ठप्प झालेले आहे. त्याचबरोबर दरवर्षी होणारे आयपीएल हे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बीसीसीआयला जवळपास चार हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

गांगुलीने एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून चांगलेच नाव कमावलेले आहे. त्याचबरोबर आता खेळाचे प्रशासनही तो चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. पण तरीही गांगुलीचे बीसीसीआयचे अध्यक्षपद धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

maharashtra times

सौरव गांगुली

नेमके घडले तरी काय…
गेल्या आठवड्यामध्ये गांगुलीने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये गांगुलीने ‘जेएसडब्ल्यू स्टील’ या कंपनीचे टी-शर्ट परीधान केले होते. ‘जेएसडब्ल्यू स्टील’ ही कंपनी जीएमआर ग्रुपची आहे. या जीएमआर कंपनीने आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स हा संघ विकत घेतला आहे. गांगुलीने दिल्ली कॅपिटल्स संघाचे मार्गदर्शकपद स्वीकारले होते. त्याचबरोबर ‘जेएसडब्ल्यू स्टील’ या कंपनीचा गांगुली हा शुभेच्छादूत आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे या गोष्टींमध्ये परस्पर हितसंबंध दिसत असल्यामुळे आता गांगुलीचे अध्यक्षपद धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.

वाचा-‘हा’ व्हिडीओ पाहाल तर म्हणाल, शाब्बास रे धोनी…

गांगुली काय म्हणाला…
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये गांगुली म्हणाला की, ” मी परस्पर हितसंबंध जपलेले नाहीत. कारण मी ‘जेएसडब्ल्यू स्टील’ या कंपनीचा शुभेच्छादूत नाही. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स या संघाची मालकी कोणत्याही सिमेंट कंपनीने घेतलेली नाही. त्यामुळे यामध्ये कोणतेही परस्पर हितसंबंध जपले गेलेले नाहीत. माझा त्यांच्या क्रिकेटशी काहीही संबंध नाही. त्यामुळे माझे त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध नाहीत.”

वाचा-निवृत्ती घेण्यापूर्वी धोनीने ‘या’ खेळाडूला दिली होती आपली जर्सी

गांगुलीने आपली बाजू याप्रकरणी स्पष्ट केली आहे. पण जर या प्रकरणी गांगुली दोषी आढळला तर त्याचे बीसीसीआयचे अध्यक्षपद धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)