sourav ganguly: सौरव गांगुलीचा विराट कोहलीला खास मेसेज, सांगितली ‘ही’ गोष्ट… – ‘i expect you to win in australia’ – bcci chief sourav ganguly’s message for virat kohli-led india

0
36
Spread the love

क्रिकेटसाठी येणारा काळ फारसा सोपा नसेल. कारण क्रिकेटला बऱ्याच अचडणींवर मात करत आपला मार्ग काढावा लागणार आहे. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास एक मेसेज दिला आहे. यापुढे जर विजय मिळवायचा असेल तर काय करावे लागेल, याचा मंत्र गांगुलीने कोहलीला दिल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-लग्न करेन तर विश्वचषक जिंकल्यावरच, रशिद खानने घेतली शपथ

करोनानंतरचे क्रिकेट फारच वेगळे असेल. कारण करोनानंतरच्या क्रिकेटसाठी आयसीसीने नवीन नियम बनवले आहेत. त्यामुळे या नवीन नियमांनुसारच संघाला आता कामगिरी करावी लागणार आहे. त्याचबरोबर आता क्रिकेट स्डेडियममध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चाहते नसतील. त्याचबरोबर करोना व्हायरसमुळे आता आशिया चषक तर रद्द करण्यात आलाच आहे. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर आयपीएल या वर्षी होणार की नाही, याबाबतही साशंकता आहे. पण आयपीएल झाली तर त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जावे लागू शकते. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताला चार कसोटी, आणि प्रत्येकी तीन-तीन वनडे आणि ट्वेन्टी-२० सामना खेळावे लागतील. यंदाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतासाठी कठीण असल्याचेही म्हटले जात आहे.

वाचा-‘करोनानंतर सर्वप्रथम भारतच आपल्या पायावर उभा राहील’

याबाबत गांगुली म्हणाले की, ” भारताने २०१८ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. पण यावेळी होणारा ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतासाठी नक्कीच सोपा नसेल. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्याच्या घडीला उत्तम दिसत आहे. भारताचाही संघ चांगला आहे. पण भारत ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ खेळणार आहे, त्यामुळे त्यांना चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल.”

वाचा-भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंना झाला करोना, कुटुंबियांचीही चाचणी करणार

गांगुली पुढे म्हणाले की, ” परदेशामध्ये जिंकायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टी या कराव्याच लागतात. परदेशात जिंकायचे असेल तर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागते. तुम्ही परदेशात जेव्हा ४०० पेक्षा जास्त धावा करता त्यावेळीच जिंकण्याची संधी निर्माण होते. हीच गोष्ट मी विराटलाही सांगितली आहे.”

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)