sports fraternity wishes Amitabh Bachchan speedy recovery as Big B tests positive for COVID 19 | “बिग बी, लवकर तंदुरूस्त व्हा!”

0
25
Spread the love

महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. पण अखेर अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं.

त्यानंतर करोना आजारातून लवकर सावरावेत आणि तंदुरूस्त व्हावेत यासाठी सर्व स्तरांतून सदिच्छांचे ट्विट पडण्यास सुरूवात झाली. शनिवारी रात्री क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यासोबतच क्रीडाविश्वातून, ‘बिग बी, लवकर तंदुरूस्त व्हा!’, अशा आशयाचे ट्विट अनेकांनी केले. केवळ क्रिकेटपटू नव्हे तर धावपटू, निवृत्त खेळाडू आणि इतर अनेक क्रीडाविश्वाशी संलग्न असलेल्यांनी अमिताभ यांच्याबाबत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)