Sub-divisional police officer’s driver shot himself msr 87|उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या

0
56
Spread the love

गडचिरोली पोलिस मुख्यालयातील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर त्यांच्या वाहनचालकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ही घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मदन गौरकर(४८) असे मृत वाहनचालकाचे नाव आहे. मदन गौरकर हे उपविभागीय पोलिस अधिकारी(अभियान) भाऊसाहेब ढोले यांचे वाहनचालक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी कामावर  गेल्यानंतर त्यांनी बंगल्यावरच रायफलमधून स्वत:वर गोळी झाडली. यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

१९९२ मध्ये गडचिरोली पोलिस दलात भरती झालेले गौरकर हे सेमाना-न्यायालय मार्गावरील आनंदनगर वसाहतीत कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे कळू शकले नाही. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 7:10 pm

Web Title: sub divisional police officers driver shot himself msr 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)