summons against indurikar maharaj for his controversial statement scj 81 | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचे समन्स, ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

0
40
Spread the love

इंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक दावा केला होता जो त्यांना चांगलाच भोवला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होताच. आता कोर्टाने त्यांना समन्सही बजावलं आहे.

काय आहे प्रकरण?
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:55 pm

Web Title: summons against indurikar maharaj for his controversial statement scj 81



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)