sushant singh rajput ddlj iconic palat scene with sara ali khan video gone viral avb 95

0
22
Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने सर्वांना धक्काच बसला. सुशांतच्या निधनानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर जुने व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसत आहेत. नुकताच सुशांतचा अभिनेत्री सारा अली खानसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटातील सीन रिक्रिएट केल्याचे दिसत आहे. सुशांतचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘केदारनाथ’ या चित्रपटात सारा अली खान आणि सुशांतने एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा आणि सुशांत बिग बॉस १३ शोमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांनी सलमानसोबत मजामस्ती केल्याचे दिसत आहे.

बिग बॉस १३चा सूत्रसंचालक सलमान खानने सुशांतला शाहरुखचा एखादा लोकप्रिय डायलॉग बोलून दाखवण्यास सांगितले होता. त्यावेळी सुशांतने अनोख्या पद्धतीने शाहरुखचा डायलॉग बोलून दाखवला होता. त्याने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटातील शाहरुख आणि काजोलचा लोकप्रिय सीन करुन दाखवला आहे. सुशांतचा अभिनय पाहून सलमान त्याची प्रशंसा करतो. ‘तू खूप छान केले आहेस’ असे सलमान त्याला बोलताना दिसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 1:30 pm

Web Title: sushant singh rajput ddlj iconic palat scene with sara ali khan video gone viral avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)