Sushant Singh Rajput Dil Bechara trailer made this record beats Avengers Endgame | सुशांतच्या ‘दिल बेचारा’ ट्रेलरने ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’लाही टाकलं मागे

0
73
Spread the love

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. ‘दिल बेचारा’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असून प्रेक्षकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुशांतच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. त्याच्या शेवटच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. २४ तासांत या ट्रेलरला सर्वाधिक लाइक्स मिळाले असून याबाबतीत ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’लाही मागे टाकलं आहे.

सुशांत सिंग राजपूत व संजना सांघी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला ४४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर युट्यूबवर या ट्रेलरला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’च्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्रेलरला ३२ लाख आणि २९ लाख अनुक्रमे व्ह्यूज मिळाले होते. ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरला अवघ्या एका तासात ५० लाख व्ह्यूज मिळाले.

येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 1:32 pm

Web Title: sushant singh rajput dil bechara trailer made this record beats avengers endgame ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)