sushant singh rajput last movie dil bechara title song released | Video : ‘दिल बेचारा’मधील गाण्यात दिसला सुशांतचा अनोखा अंदाज

0
23
Spread the love

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’मधील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ए. आर. रेहमान यांच्या आवाजातील हे शीर्षकगीत प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. चित्रपटात मॅनीची भूमिका साकारत असलेल्या सुशांतचा धमाकेदार परफॉर्मन्स या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून ए. आर. रेहमान यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.

या गाण्यात कॉलेजमधल्या कार्यक्रमादरम्यान सुशांत परफॉर्म करताना दिसतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत संजना सांघी मुख्य भूमिका साकारत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाही युट्यूबवर भरभरून प्रतिसाद मिळाला.

येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

आणखी वाचा : ‘या’ कलाकारांनी चित्रपट प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप

सुशांतने १४ जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मे महिन्यात त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकण्यात आलं होतं. मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 1:01 pm

Web Title: sushant singh rajput last movie dil bechara title song released ssv 92



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)