Swara Bhaskar reply IAS officer Sanjay Dixit mppg 94 | “हा व्यक्ती खरंच IAS आहे का?”; टीका करणाऱ्या अधिकाऱ्याला स्वराचं प्रत्युत्तर

0
58
Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘रसभरी’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमधील अश्लिल दृश्यांवर सातत्याने टीका होत आहे. आयएएस अधिकारी संजय दीक्षित यांनी देखील ‘रसभरी’वरुन स्वरा भास्करवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्विटवर आता स्वराने प्रत्युत्तर दिलं आहे. हा व्यक्ती खरंच IAS अधिकारी आहे का? असा प्रश्न तिने विचारला आहे.

अवश्य पाहा – उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या

अवश्य पाहा – सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेत्री पडली आजारी; होऊ लागलाय लो बीपीचा त्रास

काय म्हणाले होते संजय दीक्षित?

“IMDB ने स्वरा भास्करच्या रसभरी या वेब सीरिजला सर्वात कमी रेटिंग दिलं हे योग्यच झालं. मला कळत नाही स्वरा काकी या सीरिजमध्ये शिक्षक बनून कोणतं इंग्रजी शिकवतेय.” अशा आशयाचे ट्विट संजय दीक्षित यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटवर स्वराने संताप व्यक्त केला आहे. “हा व्यक्ती खरंच IAS अधिकारी आहे का? ज्याने अनेक पुस्तकं लिहिली आहेत.” अशा आशयाचे ट्विट करुन तिने IAS असोसिएशनकडे तक्रार केली आहे. स्वराचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

स्वरा भास्कर गेल्या काही काळापासून अभिनयापासून दूर होती. आता ती ‘रसभरी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र ही सीरिज प्रेक्षकांना फारशी आवडलेली नाही. यामधील पटकथा व अश्लिल दृश्यांवर अनेकांनी टीका केली आहे. IMDBवर तर १० पैकी २ रेटिंग या सीरिजला मिळाली आहे. परिणामी या सीरिजवरुन सध्या स्वराची खिल्ली उडवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 1:54 pm

Web Title: swara bhaskar reply ias officer sanjay dixit mppg 94Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)