symptoms of sickle cell disease ssj 93 | सिकल सेलग्रस्त रुग्णांनी घ्या ‘ही’ खास काळजी

0
29
Spread the love

– डॉ प्रदिप महाजन

सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. ‘सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ गवत कापण्याचा विळा किंवा कोयता असा होतो. निरोगी व्यक्तीच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. मात्र, सिकल सेल झालेल्या रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या दिसतात. सिकल सेल असलेल्या रूग्णांमध्ये लाल रक्तपेशींच्या “सिकल शेप” मुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी असते. अशा रुग्णांना करोनाची लागण झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते. करोनामुळे खोकला, श्वास घेण्यात अडचणी तसेच न्यूमोनियासारखी लक्षणे उद्भवतात आणि सिकल सेलच्या रूग्णांमध्ये हा आजार जीवघेणा ठरू शकते. सिकल सेलमुळे मुळातच रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सर्वसामान्यांच्या तुलनेने त्यांनी त्वरीत संसर्ग होऊ शकतो.

या आजाराच्या रुग्णांमध्ये शारीरिक थकवा, सांधेदुखी, रक्तक्षय, डोळे पिवळसर दिसणे अशी लक्षणं दिसतात. ऋतू बदलांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक वाढते. हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे तो बरा होण्याची शक्यता कमी असते. परंतु, आता वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन शोध लागले असून पाश्चिमात्य देशांत बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन, जीन थेरपी, स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन असे आधुनिक उपचारांचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. परंतु, या उपचार पद्धती अत्यंत खर्चीच आहेत. त्यामुळे सर्वासामान्य नागरिकांना ही उपचारपद्धती न परवडणारी आहे. सिकल सेलग्रस्त रूग्णांनी करोनासारख्या संसर्गजन्य आजारापासून संरक्षणाकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच जे रुग्ण करोना पॉझिटिव्ह असतील त्यांनी खालील प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.

१. सुरु असलेली औषधे तसेच औषधांमध्ये बदल करण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२. रोगप्रतिकारकशक्ती वाढेल अशा पदार्थांचं सेवन करावं, परंतु त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खा. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

४. सिकल सेलग्रस्त रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. ती रोखण्यासाठी मासे, अंडी आणि पूरक आहार घ्या.

५.लॉकडाउन कालावधीत या व्यक्तींनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळावे.

६. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे

७. घराचे तसेच आजूबाजूच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करा आणि स्वच्छता राखा.

८.गरज भासल्यास त्वरित वैद्यकीय सेवेचा आधार घ्यावा.

(लेखक. डॉ प्रदिप महाजन, हे रिजनरेटिव्ह मेडिकल रिसर्चर आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 6:06 pm

Web Title: symptoms of sickle cell disease ssj 93Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)