Terrorist masterminds still in Pakistan abn 97 | ‘दहशतवादी हल्ल्यांच्या सूत्रधारांचे पाकिस्तानात अद्याप आदरातिथ्य’

0
28
Spread the love

मुंबईत १९९३ मध्ये घडविण्यात आलेली बॉम्बस्फोट मालिका आणि मुंबईवर २००८ मध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांबाबतचे ठोस पुरावे भारताने दिलेले असतानाही पाकिस्तानने त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा जोरदार हल्ला भारताने पाकिस्तानवर चढविला आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांचे पाकिस्तानमध्ये अद्यापही आदरातिथ्य केले जात आहे याकडे भारताने लक्ष वेधले आहे. दहशतवाद प्रतिबंध सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या वेबिनारमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या महावीर सिंघवी यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तान सीमेपलीकडून घडविण्यात येणाऱ्या दहशतवादाचा पुरस्कर्ता असून ते जगानेही मान्य केले आहे, असे असतानाही भारताविरुद्ध खोटे आरोप करण्यासाठी पाकिस्तान या मंचाचा वापर करीत आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:30 am

Web Title: terrorist masterminds still in pakistan abn 97Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)