thane covid 19 update: thane covid 19 update: ठाण्यात करोना रुग्णवाढ कायम; जिल्ह्यात २ हजार २७ रुग्णांची नोंद – 2027 corona positive patient found in thane

0
21
Spread the love

ठाणे: कल्याण-डोंबिवलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी करोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये ५५० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. ठाणे शहरातही आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक ४२० रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. अशाप्रकारे ठाणे जिल्ह्यातील एकूण करोना बाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी नव्याने २ हजार २७ ने भर पडली. त्यामुळे रुग्ण संख्या ३८ हजार ५९४ इतकी झाली आहे. तर ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा वाढत १ हजार १७६ वर गेला आहे.

पिंपरीत मृत्यूदर वाढतोय; सरकारी-खासगी रुग्णालय ‘फुल्ल’

जिल्ह्यातील करोनाची स्थिती चिंता वाढवणारी असून दुसरीकडे ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अन्य शहरात रुग्ण संख्येचा आलेख कमी होताना दिसत नाही. ठाण्यात तब्बल ४२० रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णांची संख्या ९ हजार ९५० झाली आहे. तर ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १७ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनंतर समोर आले. कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा एका दिवसातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. एकूण ५६४ करोनाबाधित रुग्णांची नोंद दिवसभरात झाल्याने रुग्ण संख्या ८ हजार ४९ वर गेली आहे. आजपर्यंत एकूण १३० रुग्ण दगावले आहेत. नवी मुंबईमध्ये शुक्रवारी २५७ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ३४५ वर गेली आहे. तर आतापर्यंत २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज उच्चांकी ६ हजार नव्या रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

मिरा-भाईंदरमध्ये २५७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या ३ हजार ८८५ (मृत्यू १५२) वर गेली आहे. आजपर्यंत उल्हासनगरमध्ये २ हजार ३४७ रुग्ण (मृत्यू ४९), भिवंडी २ हजार १७३ रुग्ण (मृत्यू ११८), अंबरनाथ २ हजार ३२ रुग्ण (मृत्यू ५७), बदलापूर ९०६ रुग्ण (मृत्यू १५), ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ९०७ (मृत्यू ५४) रुग्ण आढळले आहेत.

पनवेलमध्ये १८६ रूग्ण आढळले

पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १८६ रूग्णांची भर पडली. त्यामुळे पनवेलमध्ये एकूण करोनाबाधितांची संख्या आता २ हजार ७६४ इतकी झाली आहे. तर विविध रूग्णालयांमध्ये ९८० जण उपचार घेत आहेत. तर आजवर ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारपासून पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन घोषित केला असल्यामुळे ही संख्या आटोक्यात येईल अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)