Thankful to the MCA for their sweet gift on my birthday says Sunil Gavaskar | वाढदिवशी सुनिल गावसकरांना MCA ने दिलं मोठं गिफ्ट

0
23
Spread the love

भारतीय संघाचे माजी मराठमोळे कर्णधार सुनिल गावसकर आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटीत भारताकडून खेळताना १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारे पहिले फलंदाज असे अनेक विक्रम गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर गावसकर समालोचन आणि वृत्तपत्रांमधून लिखाण करत असतात. मुंबई क्रिकेट आणि भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुनिल गावसकांना आजच्या दिवशी मोठं गिप्ट दिलं आहे. वानखेडे मैदानाच्या President’s Box मध्ये सुनिल गावसकर आणि त्यांच्या पत्नीसाठी दोन जागा कायम राखीव ठेवण्यात येणार आहेत.

“वानखेडे मैदानावर गावसकर दाम्पत्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा अद्याप पूर्णपणे तयार झालेल्या नसल्याचं आम्हाला लक्षात आलं. MCA अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत या दोन्ही जागा पुन्हा व्यवस्थित तयार करुन गावसकर दाम्पत्यासाठी राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे.” मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत याबद्दल माहिती दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गरवारे पॅव्हेलिअनमध्ये जे.आर.डी. टाटा, लता मंगेशकर आणि सुनिल गावसकर यांच्यासाठी पहिल्या रांगेतल्या जागा राखीव ठेवल्या होत्या. मात्र २०११ विश्वचषकादरम्यान वानखेडे मैदानातं नुतनीकरण करण्यात आलं होतं. ज्यावेळी या जागा गावसकरांच्या नावे करण्याचं काम प्रलंबित होतं.

माझ्या वाढदिवशी MCA ने मला सर्वात मोठं गिफ्ट दिल्याची प्रतिक्रीया गावसकर यांनी दिली. MCA च्या वरिष्ठ कार्यकारणीतले सदस्य नदीम मेमन आणि अजिंक्य नाईक यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 1:59 pm

Web Title: thankful to the mca for their sweet gift on my birthday says sunil gavaskar psd 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)