The internal transfers in Mumbai made by CP have been put on hold by CM and HM aau 85 |पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केले रद्द

0
21
Spread the love

मुंबई पोलीस आयुक्तांनी १० पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी काढलेल्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी स्थगिती दिली. तसेच त्यांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणीच रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मुंबईत करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

यासंदर्भातील नव्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांना मध्य मुंबईतील झोन ५ चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या ठिकाणचे उपायुक्त नियती ठक्कर हे इंटिलिजन्स ब्युरोमध्ये जॉइन्ट डेप्युटी डिरेक्टर म्हणून रुजू झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.

पोलीस उपायुक्त एन. अंबिका (मुख्यालय) यांना देखील झोन ३चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. उपायुक्त अभिषेक कुमार यांना सेन्ट्रल डेप्युटिशनवर पाठवण्यात आल्याने ही जागा रिक्त झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 7:55 pm

Web Title: the internal transfers in mumbai made by cp have been put on hold by cm and hm aau 85Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)