The threat of cyber security persists in the process of unlocking Aegon announces guidelines aau 85 |’अनलॉक’च्या प्रक्रियेत सायबर सुरक्षेचा धोका कायम; ‘एगॉन’ने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे

0
24
Spread the love

लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प झाल्याने ऑनलाईन स्वरुपात घरुन काम करण्याशिवाय अनेकांसमोर पर्याय नव्हता. मात्र, या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये बरीच वाढ झाल्याचे समोर आलं असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. दरम्यान, आता अनलॉकला सुरुवात झाली असल्याने हळूहळू सर्वप्रकारची कार्यालये खुली होत आहेत. मात्र, तरीही सर्वकाही सुरळीत करताना कंपन्यांसमोर सायबर सुरक्षेचा मोठा प्रश्न कायम आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी ‘एगॉन लाईफ इन्शुरन्स’ कंपनीच्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचे उपाध्यक्ष किरण बेलसेकर यांनी सायबर सुरक्षेसंबंधी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

सायबर सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक तत्वे – 

  1. नेटवर्क अॅक्सेस कंट्रोल (एनएसी) : अनपॅच्ड मशिन्सना नेटवर्कशी जोडण्यापासून वाचवण्यासाठी एनएसी सोल्युशनचा वापर होतो. तुमचे उपकरण पूर्णपणे समर्थित, पॅच्ड आणि अपडेटेड झाले की त्यानंतरच बिझनेस अॅप्लिकेशनला अॅक्सेस दिला जातो.
  2. पासवर्ड बदल : पासवर्ड हा सुरक्षेतील पहिला टप्पा आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी सिस्टममध्ये लॉगइन करण्यापूर्वी आपला पासवर्ड रीसेट करावा किंवा बदलावा. अनेक संस्थांनी पासवर्डची धोरणे बदलली असल्याने पासवर्ड आधीच्या टप्प्यावरच बदलला जायला हवा.
  3. डेस्कटॉप : वापरकर्ते पुन्हा कार्यालयात जाऊ लागण्याआधी आयटी विभागाने सर्व सिस्टिम्स अँटिव्हायरस सिग्नेचर, पॅचेस आणि सॉफ्टवेअर व्हर्जन्सने अपडेट करून ठेवाव्यात. पूर्ण एव्ही स्कॅनचीही खातरजमा करावी आणि डीएलपी तसेच इतर तंत्रज्ञांनांची पूर्ण तपासणी झाल्याचीही खात्री करून घ्यावी.
  4. लॅपटॉप्स : लॅपटॉप्ससाठीही याच पद्धतीने सुरक्षेची खातरजमा केली जाणं गरजेच आहे. वापरकर्त्यांना त्यांचा लॅपटॉप सिस्टम अपडेटसाठी जमा करता यावा या दृष्टीने वॉकइन सेंटर, क्लिनिक सुरू करता येतील.
  5. डेटा हायजिन : घरातून आपली वैयक्तिक उपकरणे वापरून काम करणाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक मशिनवरून संस्थात्मक माहिती काढून टाकणे उत्तम.
  6. अपवाद : रिस्क टीमने कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्व धोक्यांचे अपवाद तपासून पहावेत आणि कर्मचारी कार्यालयात आल्यावर त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी.
  7. प्रत्यक्ष सुरक्षा : अधिकृत ओळखपत्राशिवाय कोणाही कर्मचाऱ्याला किंवा इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेशास बंदी असावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 3:20 pm

Web Title: the threat of cyber security persists in the process of unlocking aegon announces guidelines aau 85


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)