Thieves stole jewelry from a jeweler’s shop msr 87| ‘पीपीई किट’ घालून आलेल्या चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडून, ६० तोळे दागिने पळवले

0
75
Spread the love

फलटण शहराच्या मध्यवर्ती भागातील ज्वेलर्सच्या दुकानांची भिंत फोडून ६० तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली. पहाटे दोन वाजेच्या सुमारास हिराचंद कांतीलाल सराफ & सन्स या दुकानाची भिंत फोडून चोरी झाली आहे. काउंटरवर शोकेसमध्ये लावलेले ६०० ग्रॅम वजनाचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले आहेत. चोरट्यानी एक ग्रॅम व चांदीच्या दागिन्यांकडे दुर्लक्ष करत व तिजोरी न फोडता चोरी केली आहे.

भिंत तोडून आत प्रवेश करण्यापूर्वी तेथील कॅमेरे फिरवून लावले होते. आतील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले तिघे चोरटे करोना पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेले पीपीई किट परिधान करुन आल्याने त्यांची ओळख पटणे काहीसे कठीण होणार आहे, दरम्यान घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते, त्यांचा अहवाल तपासासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व त्यांचे सहकारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ, पोलीस उप निरीक्षक बनकर, व अन्य अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 9:59 pm

Web Title: thieves stole jewelry from a jewelers shop msr 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)