Three more corona positive patients in akola, total cases 1703 one more death today scj 81| अकोल्यात आणखी एकाचा मृत्यू; ३८ नवे रुग्ण

0
66
Spread the love

लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : जिल्ह्यात आणखी एक मृत्यू व ३८ नव्या रुग्णांची नोंद रविवारी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने आज सतराशेचा टप्पा ओलांडला असून ती १७०३ वर पोहचली. शहरासह जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या व मृत्यूदर धोकादायक ठरत आहे.

कोला जिल्ह्यात करोनाच्या उद्रेकाने अद्याापही थांबण्याचे नाव घेतलेले नाही. रुग्ण संख्येसोबतच करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. दररोज रुग्ण दगावत आहेत. गत काही दिवसांपासून मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यातील एकूण २४६ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २०८ अहवाल नकारात्मक, तर ३८ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वोपचार रुग्णालयातून आज दुपारनंतर तीन जणांना सुट्टी देण्यात आली असून, जिल्ह्यात आतापर्यंत १२५८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, काल रात्री एका रुग्णांचा मृत्यू झाला. सिंधी कॅम्प येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाला २ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्री उपचारादरम्यान ते दगावले.

आज सकाळच्या अहवालात ३८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात ११ महिला व २७ पुरुष आहेत. त्यामध्ये पक्की खोली येथील आठ जण, आदर्श कॉलनी, अकोट येथील प्रत्येकी सात जण, चांदुर पाच जण, बार्शिटाकळी, कच्ची खोली येथील प्रत्येकी दोन जण, तर राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव, पातूर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. १२७ अहवाल नकारात्मक आले आहेत.
रुग्णवाढीचा वेग पुन्हा वाढला
जिल्ह्यात मधल्या काही दिवसांत रुग्ण वाढीचा मंदावलेला वेग दोन दिवसांत पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत ८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वोपचार रुग्णालय व कोविड केअर केंद्रामध्ये दाखल रुग्ण संख्याही साडेतीनशे पार गेली. सध्या ३५६ रुग्णांवर उपचार सुरू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 8:28 pm

Web Title: three more corona positive patients in akola total cases 1703 one more death today scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)